सातारा, (प्रतिनिधी) : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून दुपारी दोन वाजता नदी विमोचकद्वारातून होणारा एक हजार क्युसेक विसर्ग वाढवून तो एक हजार ४०० क्युसेक करण्यात आला. धरण पायथा वीजगृहासह नदीपात्रात एकूण तीन हजार ५०० क्युसेक विसर्ग होत आहे. कोयना व कृष्णा काठावर पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्याद्वारे दोन हजार १०० क्युसेकविसर्ग व नदी विमोचकातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चार मार्चपासून नदी विमोचकातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागणी वाढल्याने नदी विमोचकातून ४०० क्युसेक विसर्ग वाढविला. कोयना नदीपात्रात एकूण तीन हजार ५०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. चार मार्चला कोयना जलाशयाचा एकूण पाणीसाठा ७४.८१ टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा ६९.६९ टीएमसी होता. आज जलाशयाचा एकूण पाणीसाठा ४०.१२ टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा ३५ टीएमसी आहे.
Fans
Followers